खुनाच्या गुन्ह्यात साक्ष न देण्यासाठी सोशल क्लबमध्ये तोडफोड करीत एकाला बेदम मारहाण

खुनाच्या गुन्ह्यात साक्ष न देण्यासाठी सोशल क्लबमध्ये तोडफोड करीत एकाला बेदम मारहाण
15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : प्रतिनिधी
दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये साक्ष न देण्यासाठी सोशल क्लब वर जाऊन तोडफोड करीत टोळक्याने एकाला जबरदस्तीने मारहाण केल्याची घटना न्यू डीजे मार्केट जवळ असणाऱ्या चांदीलकर प्लाझा येथे घडली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्रांनी दिलेली माहिती अशी की अरुण गोसावी हे तुकाराम वाडी जळगाव येथे वास्तव्याला असून त्यांचे डजे मार्केट जवळ चांडेलकर येथे सोशल क्लब आहे.
गुरुवारी रात्री तेथे १५ जणांनी या ठिकाणी येऊन अरुण गोसावी यांना शिवीगाळ करीत खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये तसेच दर महिन्याला आम्हाला सोशल क्लब कडून पैसे द्यावे लागतील असे म्हणून करण्यास सुरुवात केली. . यावेळी भागीदार ब्रिजलाल वालेचा हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनादेखील धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्यानंतर टोळक्याने गल्ल्यातील आठ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेत क्लबमधील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. अपार्टमेंटच्या खाली दुचाकींचीदेखील या टोळक्याने तोडफोड करून ते पसार झाले. या प्रकरणी गोसावी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.