Crime

अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छेडछाडीप्रकरणी फरार शिक्षक अटकेत

अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छेडछाडीप्रकरणी फरार शिक्षक अटकेत

एरंडोल ;- अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छेडछाडीप्रकरणी फरार असलेल्या मंगेश हरी पाटील (वय ५५) या शिक्षकाला अखेर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. तो बीड रस्त्यावरील चहाच्या टपरीवर बसलेला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटक करण्याच्या प्रयत्नात त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला पकडले.

ही कारवाई १४ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आली. एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश गायकवाड, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, तसेच हवालदार महेंद्रसिंग पाटील आणि लक्ष्मण पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला.

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास करून अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आरोपीला रात्री ८ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात आणून अधिकृतपणे अटक करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा अधिक सतर्क असल्याचे दिसून येत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button