अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक ; मुद्देमाल हस्तगत

अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक ; मुद्देमाल हस्तगत
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अमळगाव आणि कळमसरे परिसरात पोलिसांनी केलेल्या धाडींमध्ये अवैध देशी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ८ हजार ८०८ रुपयांच्या ९१ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक जीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पवार, संजय पाटील, भावेश देवरे, दीपक पाटील व हेमचंद्र साबे यांनी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मारवड–कळमसरे रस्त्यावर हॉटेल राधिका समोर छापा टाकला. यावेळी जीवनलाल काशिनाथ सोनवणे हा देशी व विदेशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ३ हजार ५१५ रुपयांच्या ४१ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अमळगाव–जळोद रस्त्यावर रामकृष्ण बुधा शिरसाठ (वय ५३) हा दारू विक्री करताना पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्याकडून ५ हजार २९३ रुपयांच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी असिफ मुशीर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामकृष्ण शिरसाठ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






