जळगावात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला अटक; पोलिसांची तत्पर कारवाई

जळगावात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला अटक; पोलिसांची तत्पर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी रात्री मोठ्या शिताफीने अटक केली. समाधान हरचंद भोई (वय ३२, रा. साखरडे, रामानंद नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२१ जुलै रोजी रात्री ९.४० वाजता रामानंद नगर परिसरात एक इसम हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुधाकर चौधरी, पोना अतुल चौधरी व योगेश भिल यांनी सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले.
तपासादरम्यान समाधान भोई याला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चाळीसगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते, तरीही तो शहरात येऊन पुन्हा गुन्हेगारी कृत्य करीत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध CCTNS गु.र.नं. २६६/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम १४२ सह शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या कामगिरीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी पोलिसांच्या तात्काळ कारवाईचे कौतुक केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुधाकर अंभोरे हे करत आहेत.