Crime

‘५०ची लायकी आहे का ?’ म्हणणाऱ्या पोलिसासह तिघांवर निलंबनाची कारवाई

महापोलीस न्यूजचा दणका ; पोलीस अधीक्षकांची कारवाई

‘५०ची लायकी आहे का ?’ म्हणणाऱ्या पोलिसासह तिघांवर निलंबनाची कारवाई

महापोलीस न्यूजचा दणका ; पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

केळी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करताना ‘५०ची लायकी आहे का?’ अशी विचारणा करणाऱ्या पोलिस नाईक पवनकुमार विष्णू पाटील यांच्यासह सहायक फौजदार गुलाब हिलाल मनोरे आणि पोहेकॉन्स्टेबल चेतन चंद्रमोहन सोनवणे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केली असून, त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.याबाबतचे वृत्त सर्व प्रथम महा पोलीस न्यूज ला प्रकाशित करण्यात आले होते

पाचोरा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हे तिन्ही कर्मचारी वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. रविवार, ३० मार्च रोजी कजगाववरून पाचोऱ्याकडे येणारे एक केळी वाहतूक करणारे वाहन जामनेर रस्त्यावर आले असता, या तिघांनी ते अडवले. पोलिस नाईक पवनकुमार पाटील याने चालकाकडे पैशाची मागणी केली आणि तडजोडीदरम्यान ‘५०ची लायकी आहे का?’ असा प्रश्न विचारला. यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस उभे असलेले सहायक फौजदार मनोरे आणि पोहेकॉन्स्टेबल सोनवणे यांनीही वाहन थांबवल्याचे दिसून आले. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने मोबाइलमध्ये चित्रित केली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. याशिवाय, पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत या तिघांची खात्यांतर्गत प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने कठोर पाऊल उचलले गेल्याचे संकेत मिळाले आहेत, अशी माहिती डॉ. रेड्डी यांनी दिली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button