चाळीसगावमध्ये गटारात आढळला पुरुष मृतदेह; ओळख पटवण्याचं आव्हान

चाळीसगाव (भूषण शेटे) : शहराच्या गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात सावली हॉटेलजवळच्या गटारात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना आज, १८ ऑगस्ट २०२५ रोजी उघडकीस आली.
पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे हा मृतदेह गटारात वाहून आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट असून, चेहरा पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला आहे आणि शरीरही फुगून गेलं आहे. त्यामुळे ही हत्या आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही आणि यावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. योगेश माळी, सायक साहेब आणि दिलीप रोकडे यांच्यासह फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांसमोर सध्या या मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान आहे. पुढील तपास सुरू आहे.






