Detection

Detection Story : भर बाजारात सिनेस्टाईल थरार, गोळीबार करणारा पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । दि.१२ ऑक्टोबर २०२४ । धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गावठी कट्ट्याने गोळीबार करणाऱ्याला जळगाव एलसीबी पथकाने सिनेस्टाईल अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून फरार असलेला आरोपी पिंप्री बाजारात आल्याची माहिती मिळताच पथकाने तब्बल २ किलोमीटर पाठलाग करून त्याला अटक केली आहे. पुढील कारवाई करण्यासाठी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

धरणगाव पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३५४/२०२४ भा.न्या.संहीता कलम १३२,११०,११२,१८९ (२),१८९ (४) १९० सह कलम ३,२५ शस्त्र अधिनियम अन्वये दाखल गुन्हयात गावठी कटटयाने फायर करणारा मुख्य आरोपी गुन्हा घडल्यापासुन फरार असून त्यास ताब्यात घेवुन त्याचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले होते.

एक आरोपी घेऊन येताना मिळाली बातमी
गुन्हा घडल्यापासून एलसीबीचे पथक आरोपीच्या मागावर होते मात्र तो मिळून येत नव्हता. एलसीबीचे पथक दुचाकी चोरीतील एका आरोपीला एरंडोल येथून ताब्यात घेऊन जळगावकडे येत होते. अर्ध्या रस्त्यात पोहचल्यावर पथकाला गोळीबार करणारा आरोपी निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे (कोळी) वय ३२ वर्षे रा.वाकटुकी ता. धरणगाव हा पिंप्री खुर्द ता.धरणगाव येथे आठवडे बाजारात फिरत असल्याची माहीती मिळाली.

भर बाजारात सिनेस्टाईल पाठलाग
पथकाने आपले वाहन लागलीच पिंप्री खुर्दकडे वळविले. काही अंतरावर दुचाकी चोरीतील आरोपीला एका कर्मचाऱ्याच्या ताब्यात देत पथक बाजारात पोहचले. बाजारात पोलिसांना पाहून निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे (कोळी) याने पळ काढला. बाजारातून २ किलोमीटर पाठलाग केल्यावर पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून गुन्हयात फायर केलेला गावठी बनावटीचा कटटा मॅगझीनसह ताब्यात घेण्यात आला आहे.

या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार जितेंद्र पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील व महेश सोमवंशी यांनी केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button