डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२५
जळगाव प्रतिनिधी ;- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल केले. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जळगाव महानगरपालिका व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.