‘ड्राय डे’च्या पार्श्वभूमीवर जळगावात अवैध दारूची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली

‘ड्राय डे’च्या पार्श्वभूमीवर जळगावात अवैध दारूची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
दोन रिक्षांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली असून दारू आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आले आहे.दोघांवर याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ शाहरुख सुपडू शिकलीकर रा. कानळदा हा त्याच्या ताब्यातील प्रवासी रिक्षा क्रमांक( MH 19 CE 2744) मध्ये विना पास परवाना विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याच दुपारी साडेचार वाजता ताब्यात घेऊन त्याच्याकडून मॅकडॉल रॉयल स्टॅग ,किंगफिशर बियर, रॉयल चॅलेंज, मॅकडॉल रम अशा विदेशी दारूच्या बाटल्या आणि रिक्षा सह एकूण दोन लाख १६ हजार ३४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
तर दुसऱ्या कारवाईत इच्छा देवी चौकात रितिक रवींद्र बाटुंगे राहणार तंबापुरा कंजरवाडा हा त्याच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक (MH19 CW 1391) मध्ये विना पास परवाना दारूची चोरटी वाहतूक करीत असताना रात्री साडेआठ वाजता मिळून आला होता. त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या रिक्षासह एकूण १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईत मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून ड्राय डे अनुषंगाने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने करण्यात आली .
कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारीसंदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वपोलीस निरीक्षक बबन आव्हाड साहेब यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी राजेश मेढे संजय हिवरकर पोलीस हवालदार हरिलाल पाटील अक्रम शेख अशांनी केलेली आहे