बसस्थानकातून दुचाकी चोरी

अमळनेर (पंकज शेटे):- शहरात 3 रोजी एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आनंदा दगा सैदाणे रा. दोधवद ता. अमळनेर हे त्यांच्या गावातील दरबारसिंग खंडू राजपूत यांच्या सोबत दुचाकी क्रमांक (एम एच 19 डी एफ 2363) ने 3 रोजी अमळनेर शहरात किराणा करण्यासाठी आले होते, किराणा झाल्यानंतर आनंदा सैंदाणे हे दरबारसिंग राजपूत यांना बसस्थानकात सोडायला आले होते. बसस्थानक आवारातील शौचालयाकडे त्यांनी 10.35 वाजता मोटारसायकल लावली. दोघे जण बस ची वाट पाहत होते.।। वाजता दोधवद दरबारसिंग राजपूत बसमधे बसले. व नंतर आनंदा सैंदाणे हे पुन्हा दुचाकी लावलेल्या त्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी इतरत्र शोध घेतला असता दुचाकी न मिळून आल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. प्रमोद पाटील करत आहेत.