Social

एकता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  यांचा सत्कार 

एकता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  यांचा सत्कार 

जळगाव प्रतिनिधी
१०० दिवसाच्या मर्यादित वेळेत पारदर्शक प्रशासन, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यामधून जळगाव जिल्हा अधिकारी म्हणून आपण जे द्वितीय क्रमांक पटवून जळगाव जिल्ह्याचे नाव झळकावले.

या यशाबद्दल जळगाव जिल्हा एकता संघटन आपले अभिनंदन करीत असून हा पुरस्कार आम्हा सर्व जळगावकरांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात भावना प्रकट करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे एकता संघटनेतर्फे शाल, श्रीफळ व फ्रेम (स्मृती चिन्ह) देऊन कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे समन्वयक फारुक शेख व अनिस शहा यांनी फ्रेम भेट दिली. तर नदीम मलिक व
मझहर खान यांनी शाल अर्पण केली, श्रीफळ मतीन पटेल व सलीम इनामदार दिले.

याप्रसंगी एकता संघटनेचे फारुक शेख, नदीम मलिक, मजहर खान, मतीन पटेल, अनिस शहा, सलीम इनामदार, महमूद पिंजारी, समीर शेख, कासिम उमर आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना यांचे सत्कार करताना फारुक शेख नदीम मलिक मदर पठाण अनिस शहा व मेहमूद पिंजारी आदी दिसत आहे

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button