जळगाव जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आघाडीवर, महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर
जळगाव:-राज्यात आज 20 रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून भाजप 124 शिवसेना शिंदे गट 55 तर राष्ट्रवादी अजित पवार गट गटाचे 37 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत असून जळगाव जिल्ह्यातील महायुतीचेच उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन हे सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच महायुतीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मधून विजयी होणार असल्याचे दिसून येत आहे. जळगाव मतदार संघातून आमदार राजू मामा भोळे हे तिसऱ्यांदा विजय होण्याकडे वाटचाल करीत आहे. संजय सावकारे हे भुसावळ मतदार संघातून आघाडीवर असून रावेर मतदार संघातून भाजपचे अमोल जावळे अमळनेर आतून मंत्री अनिल पाटील, चाळीसगाव मतदार संघातून मंगेश चव्हाण, पारोळा मतदार संघातून शिवसेनेचे अमोल पाटील, साई नगरातून शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, चोपडा मतदार संघातून चंद्रकांत सोनवणे हे सर्व महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याने जिल्ह्यातून हा महायुतीचेच उमेदवार निवडून येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अर्थात जनतेने महायुतीलाच कौल दिलेला आहे.