Politics
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकारांशी साधणार संवाद

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकारांशी साधणार संवाद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज पत्रकार परिषद
मुंबई प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आयोगाची भूमिका, पुढील प्रक्रिया, निवडणूक कार्यक्रमासंदर्भातील माहिती तसेच विविध प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.






