Other
निधन वार्ता : उद्योजक सुनील झंवर यांना पितृशोक

महा पोलीस न्यूज । दि.२० फेब्रुवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सुनील झंवर यांचे वडील देवकीनंदन पितांबर झंवर (वय-८८) यांचे गुरुवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता साई निवास, प्लॉट क्रमांक ११, सुहास कॉलनी, जयनगर, हॉटेल रॉयल पॅलेस येथून नेरी नाका स्मशानभूमी येथे जाणार आहे. देवकीनंदन झंवर हे मधुकर, रामचंद्र, किरण, प्रवीण यांचे मोठे भाऊ, सुनील झंवर यांचे वडील तर सूरज झंवर यांचे आजोबा होते.