Politics

एफबीआयच्या संचालकपदावर मूळ भारतीय वंशाच्या वकिलाची नियुक्ती

वॉशिंग्टन डीसी – मूळ भारतीय वंशाच्या नागरिकानं पुन्हा एकदा ट्रम्प प्रशासनात मोठ्या पदावर स्थान मिळविलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) कश्यप उर्फ काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) पुढील संचालक म्हणून घोषणा केली आहे.

काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी संरक्षण आणि गुप्तचर विभागातील विविध वरिष्ठ पदांवर भूमिका बजाविली. काश पटेल यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमकपणं प्रचार केला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button