भडगाव शहरात स्वच्छता मोहीम व डास प्रतिबंध फवारणीसाठी पदाधिकारी महिलांचे साकडे…!

भडगाव शहरात स्वच्छता मोहीम व डास प्रतिबंध फवारणीसाठी पदाधिकारी महिलांचे साकडे…!
भडगांव (प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे शहरातील कॉलनी सह सर्वच ओपन स्पेस मध्ये पावसाचे व काही ठिकाणी फुटलेल्या गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचत आहे. परिणामी डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, हिवताप, मलेरिया सारखे आजारामुळे नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तसेच ओपन स्पेस मध्ये व्यापक स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात यावी. तेथील साचलेले पाणी काढून अनावश्यक काटेरी झाडे झुडपे काढणे, नवीन पाईप लाइनचे खड्डे बुजविणे, तुटलेल्या गटारी बांधणे, फवारणी करणे, रस्त्यालगतची अनावश्यक काटेरी झुडपे काढणे यासाठी व्यापक मोहीम राबवावे अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेविका तथा शेतकरी संघ संचालिका योजना पाटील, अभिनव संस्था अध्यक्षा डॉ. सुवर्णा पाटील, समन्वयिका मनिषा पाटील, सोनाली पाटील आदी महिलांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे, आस्थापना प्रमुख राहुल साळुंखे, शहर अभियंता अपूर्वा आगळे, आरोग्य विभाग प्रमुख छोटू वैद्य यांना दिले. मुख्याधिकारी यांनी याबाबत व्यापक स्वरूपात मोहीम राबविण्यात येईल तसेच सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वास्त केले.






