पद्मश्री डॉ भवरलाल जैन संजीवनी दिनानिमित्त राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा
जळगाव (प्रतिनिधी)वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (वीफा) च्या मान्यतेने जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या *संजीवनी* दिनानिमित्त लाडक्या मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले असून १२ डिसेंबर संजीवनी दिवशी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
राज्यात प्रथमच लाडक्या मुली फुटबॉल स्पर्धा निमित्त सर्व महिलांचा समावेश
पद्मश्री डॉ.भवरलाल जैन यांचा १२ डिसेंबर हा ८७ वा जन्मदिन संजीवनी दिन म्हणून साजरा होत असल्याने त्यादिनानिमित्त राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार स्थापन झाले त्याचप्रमाणे राज्यस्तरावर १६ वर्षातील मुलींचा २४ जिल्ह्यातील ४८० मुलींचा सहभाग व त्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून १२ महिला पंच, तसेच एक महिला मॅच कमिशनर म्हणून जळगावी येत आहे.
स्पर्धा समिती प्रमुख म्हणून जळगावच्या बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉक्टर अनिता कोल्हे, यांना सहकार्य करणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल च्या छाया बोरसे पाटील, गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेजच्या हिमाली बोरोले व सेंट जोसेफच्या प्रशिक्षिका रोहिणी सोनवणे यांचा सुद्धा सहभाग आहे.
जळगाव सुद्धा महिलांनाच आमंत्रित
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने सुद्धा सदर स्पर्धेच्या उद्घाटन ,पारितोषिक व दैनंदिन उत्कृष्ट खेळाडूंच्या पारितोषिक देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला खासदार, पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना आमंत्रित केलेले आहे.
क्रीडा प्रेमींना आवाहन
दिनांक ८ डिसेंबरला ८ स्पर्धा, ९ डिसेंबरला ८ स्पर्धा, १० व ११ डिसेंबरला प्रत्येकी ४ स्पर्धा व १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या स्थानासाठी व अंतिम विजेते पदासाठी २ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या स्पर्धा होणार आहे
उद्घाटन व पारितोषिक
संजीवनी दिनानिमित्त होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन ८ डिसेंबर सकाळी १० वाजता तर पारितोषिक वितरण समारंभ १२ डिसेंबर रोजी ४.३० वाजता होणार आहे दोन्ही कार्यक्रमास व दैनंदिन स्पर्धेला जळगावकरांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर अनिता कोल्हे, सचिव फारुख शेख, जफर शेख, अब्दुल मोहसीन, भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, इम्तियाज शेख, ताहेर शेख व शेखर देशमुख आदींनी केलेले आहे.