भुसावळच्या वृद्धाची 19 लाखात फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : बँकेचे व्यवहार घरपोच करून चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आम्हीच दाखवून एका 65 वर्षीय वृद्धाला 19 लाख 465 रुपयांचा चुना लावल्याची घटना भुसावळ शहरात उघडकीस आली असून या पकरणी जळगावच्या दोन जणांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तापी नगरमधील प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (वय६५) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त कर्मचारी आहे.
त्यांना, १० मार्च २०२३ ते ६ डिसेंबर २०२३च्या दरम्यान जळगाव येथे राहणारे संदीप यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ, असे सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून त्यांच्या घरी आणून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी २५ नोव्हेंबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली.
त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय विजय गायकवाड करत आहेत.