शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष: ठेकेदाराची पावणेतीन कोटी रुपयांत फसवणूक
जळगाव;- एका खाजगी ठेकेदाराला नफ्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत पावणेतीन कोटी रुपयात फसवणूक केल्याची घटना २६ जून ते 25 नोव्हेंबर दरम्यान घडली असून याप्रकरणी सायबर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अमळनेरच्या एका खाजगी ठेकेदाराला व्हाट्सअप ग्रुप मध्ये अजय गर्ग नावाच्या व्यक्तीने ॲड करून त्याच ग्रुप मधील रितू बोरा नामक व्यक्तीने लिंक पाठवून एप्लीकेशन द्वारे शेअर ट्रेडिंग च्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. ठेकेदाराने एप्लीकेशन डाउनलोड करून काही रक्कम यात गुंतवले. त्यात त्यांना नफा म्हणून 1000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांचा विश्वास संपादन करून मोठी रक्कम गुंतवण्यास सांगितल्यानंतर त्यांनी 26 जून पासून पाच महिन्याच्या कालावधीत रक्कम गुंतवली. ही रक्कम दोन कोटी बहात्तर लाख रुपये होती मात्र कोणताही परतावा मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजतात त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन अजय गर्ग व रितू बोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.