जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा 2024 चा निकाल घोषित!
फेरगुण तपासणीच्या अर्जासाठी ५ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत
जळगाव, ;- सहकार विभागांतर्गत जळगाव केंद्रावर दिनांक २४ मे, २५ मे व २६ मे २०२४ रोजी जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. परिक्षार्थ्यांना सदर परिक्षेचा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येणार आहे. तसेच पीडीएफ फॉरमॅटमध्ये https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए. मंडळ” येथे पहावयास उपलब्ध राहील.
५ जानेवारीपर्यंत फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थीना https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉगइन व पासवर्डद्वारे अर्ज करता येईल. फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थींना फेरगुणमोजणी शुल्क भरावे लागणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये फि आणि अधिक बँक चार्जेस या प्रमाणे परिक्षार्थींनी चलनाव्दारे शुल्क भरायचे आहे.
बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत ५ जानेवारी पर्यंत राहणार आहे. सदर चलन बँकेत ५ जानेवारी पर्यंत (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) या कालावधीत भरणा करावे आवश्यक आहे आणि विहीत तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही अशी माहिती सहाय्यक निबंधक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.