Crime

जळगावात घरफोडीचे सत्र सुरूच; लक्ष्मीनारायण नगरात मध्यरात्री चोरी

जळगावात घरफोडीचे सत्र सुरूच; लक्ष्मीनारायण नगरात मध्यरात्री चोरी

कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास, सीसीटीव्हीत चोरटे कैद

जळगाव : शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसत नसतानाच अयोध्या नगर परिसरातील लक्ष्मीनारायण नगरात मध्यरात्री घरफोडी झाल्याची घटना सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

घर बंद असल्याची संधी साधली

लक्ष्मीनारायण नगरातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी दीपक वराडे हे त्यांच्या मूळ गावी गाडेगाव (ता. जामनेर) येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास घराचा कडी-कोयंडा तोडला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटाची झडती घेतली. त्यातील सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.

शेजाऱ्यांना दरवाजा उघडा दिसला

सोमवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास घराचा दरवाजा उघडा असल्याचे आले. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वराडे यांना माहिती दिली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

सीसीटीव्हीत चोरटे कैद

दरम्यान, चोरट्यांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असून, चोरीतील मुद्देमाल आणि आरोपींचा माग काढण्यासाठी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे अयोध्या नगर व लक्ष्मीनारायण नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button