Maharashtra
गिरणा प्रकल्पातून विसर्गात वाढ ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गिरणा प्रकल्पातून विसर्गात वाढ ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जळगाव प्रतिनिधीI प्रकल्पामध्ये वाढत्या पाणलोट क्षेत्रातील आवक पाहता आज दि. १४ रोजी सायकाळी ७ वाजता प्रकल्पाचा विसर्ग ८१४ क्युसेक्स वरून वाढवून २४७६ क्युसेक्स (७०.७क्युमेक्स) करण्यात आला आहे. चाळीसगाव पाटबंधारे विभागाने नागरिक, शेतकरी व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या प्रकल्पाचे वक्रद्वार क्र. १ व ६ हे प्रत्येकी ३० सेंमीने उघडे असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पुढील काळात प्रकल्पातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात वाढ अथवा घट करण्यात येईल. दरम्यान – जिल्ह्यातील वाघूर धरणही ९५.५३ टक्के भरले आहे.






