Crime
गिरणा पात्रातून दिवसा अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त

भडगाव प्रतिनिधी : शहराजवळील घोडदे येथील गिरणा नदी पात्रातून दिवसाढवळ्या गिरणा नदी पात्रात ट्रॅक्टर लावत अवैध वाळू भरत असताना भडगाव महसूल विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई शुक्रवार रोजी दुपारी करण्यात आली. सदर भडगाव शहरात अवैध वाळू वाहतुकीने डोके वर काढले असून याबाबत पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने या अवैध वाळू वाहतुकीच्या कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे. ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली
पथक :- ग्रा. म. अधिकारी योगेश पाटील, निखिल बावस्कर,व्ही. सी. पाटील, एम जे खाटिक, शुभम चोपडा, गितेश महाजन, राहुल माळी, लोकेश महाजन, महसूल सेवक किरण मोरे आदींनी केली आहे सदर ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालय येथे जप्त करण्यात आले असून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.






