Crime

बकरी-बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; बकरीसह रोख रक्कम जप्त

जळगाव प्रतिनिधी I जळगाव शहरात प्राणी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असताना, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तीन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईत गणेश वासुदेव जाधव (वय २०), गणेश अशोक पाटील (वय २१) आणि अक्षय विजय वंजारी (वय २३), सर्व रा. चिंचोली, ता. जळगाव, यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीला गेलेली बकरी, बोकडाच्या विक्रीतून मिळालेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय २६, रा. दत्त मंदिर जवळ, शनिपेठ) यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या ७,००० रुपये किमतीच्या बोकडाची आणि आवेश शेख यांच्या ६,००० रुपये किमतीच्या बकरीची चोरी २७ ऑगस्ट २०२५ रोजी अज्ञात व्यक्तींनी केली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. २१६/२०२५ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.  चौकशीदरम्यान आरोपींनी शनिपेठ हद्दीतील चोरीसह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ बकऱ्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी खाटीक राहुल रतन राऊळकर याच्याकडून चोरीला गेलेली बकरी जप्त केली, तसेच बोकडाच्या विक्रीतून मिळालेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, पोना किशोर पाटील, पोका रतनहरी गिते, सिद्धेश्वर डापकर, प्रदीप चवरे आणि रविंद्र कापडणे यांनी हि कारवाई केली अटक केलेल्या आरोपींना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button