गोदावरी आय एम आर महाविद्यालयची स्पेक्ट्रम कंपनीस भेट

जळगाव — गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालय जळगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल उमाळे जळगाव येथे औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते.
या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल कंपोनंट्स, फॅब्रिकेशन ,मोल्डिंग ,पावडर कोटिंग या प्रकारची कामे केली जातात. एसी बॉक्स, बोर्ड पॅनल, एम. सी. बी ,होल्डर्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यात येते. लेग्रंड, चेसेस ब्रेक, जैन या कंपन्यांना स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट वितरण करते. बी टू बी बिजनेस, इम्पोर्ट एक्स्पोर्ट, रॉ मटेरियल ,मोल्डिंग, मशीनिंग ,प्रोडक्शन लाईन या विषयी मानवसंससाधन विभाग निखिल कुलकर्णी आणि टेक्निकल टीम यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.औद्योगिक दौर्याचे नियोजन आणि व्यवस्थापन प्रा. चंद्रकांत डोंगरे प्रा. महेश राऊत यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले