दसऱ्याच्या अगोदर सोन्याच्या दरात झेप, चांदीने गाठला नवा उच्चांक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात असून तीन दिवसांत दसरा सण येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोनं-चांदीच्या भावाने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीने तब्बल ₹१,४५,००० प्रति किलो असा नवा उच्चांक गाठला आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०५,८००, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१५,५०० झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर ₹१,४५,००० प्रति किलो झाला आहे.
सण-उत्सव काळात विशेषतः दसरा, दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीमुळे सोनं-चांदीच्या बाजारपेठेत मोठी चैतन्यपूर्ण हालचाल दिसून येत आहे. ग्राहक शुभमुहूर्ताचा लाभ घेण्यासाठी दागिने खरेदीला प्राधान्य देत आहेत.
भंगाळे गोल्डमध्ये सध्या आकर्षक ऑफर्स, हप्त्यावरील योजना आणि नवरत्नांसह विविध दागिन्यांचे डिझाईन्स उपलब्ध आहेत. शुद्धतेची हमी व आधुनिक डिझाईन्समुळे ग्राहकांचा कल भंगाळे गोल्डकडे वाढत आहे.





