Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोनं स्थिर तर चांदी उच्चांकावर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोनं-चांदीचे ताजे दर जाहीर झाले आहेत. जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काळात सोन्याचे दर स्थिर राहिले असले तरी चांदी सलग उच्चांकावर आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,००,९४५, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१०,२०० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२९,५०० इतकाच कायम आहे.
गेल्या आठवडाभरात सोन्यात मोठे चढ-उतार दिसले असले तरी आता दर स्थिर झाले आहेत. मात्र, चांदीने सलग वाढ कायम ठेवून गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दरामुळे चांदीत गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे.
भंगाळे गोल्डमध्ये दररोजचे अद्ययावत भाव, शुद्धतेची हमी, आकर्षक डिझाईन्स आणि विशेष ऑफर्स यामुळे ग्राहकांचा विश्वास कायम टिकून आहे.




