Gold-Silver Rate : सोन्याच्या दरात किंचित वाढ, चांदी ₹१.५० लाखांवर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळीनंतर सुरू झालेल्या लग्नसराईच्या हंगामाचा सराफ बाजारात स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू असून आज सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीचा दर ₹१.५० लाखांच्या आसपास स्थिर आहे.
जळगाव आणि सावदा येथील विश्वसनीय सुवर्णव्यवसायिक भंगाळे गोल्ड यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या आजच्या दरानुसार..
आजचे दर (BHANGALE GOLD – जळगाव & सावदा):
| धातू | कॅरेट/प्रमाण | दर |
| सोने | 22 कॅरेट | ₹१,०९,९०० प्रति तोळा |
| सोने | 24 कॅरेट | ₹१,२०,००० प्रति तोळा |
| चांदी | किलो | ₹१,५०,००० प्रति किलो |
(Rates may change during the day)
गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीनंतर बाजार आता पुन्हा वाढीच्या टप्प्यावर जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचा फ्यूचर बाजार आणि लग्नसराईतील ग्राहकांची मागणी हे घटक दरात स्थिर वाढ दाखवत आहेत.
चांदीच्या दराबाबत गेल्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली होती. मात्र गेल्या तीन दिवसांत चांदीचा दर स्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार “लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढेल, तर चांदीमध्ये गुंतवणूकदारांचा रस कायम परंतु मर्यादित राहू शकतो.”




