दिवाळीचा उत्साह वाढताच सोन्याचे दर पुन्हा उंचावले; चांदीतही वेगाने वाढ

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी जवळ येत असताना सोन्याचे दर सातत्याने वाढत्या मार्गावर आहेत. आज सोमवारी जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड दालनातील दरांनुसार २४ कॅरेट सोन्याने नव्या उच्चांकाला स्पर्श केला आहे.
भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार आजचे दर २२ कॅरेट सोने प्रति तोळा १,०९,४६०, २४ कॅरेट सोने प्रति तोळा १,१९,५००, चांदी प्रति किलो १,५१,००० असे दर आहेत.
गेल्या दोन दिवसांतच सोन्याच्या दरात सुमारे ₹१,५०० ची वाढ झाली आहे, तर चांदीने तब्बल ₹२,००० प्रति किलोची झेप घेतली आहे. सणासुदीचा हंगाम, लग्नसराईचे बुकिंग आणि गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी यामुळे दर वाढीचा कल कायम राहिला आहे.
भंगाळे गोल्डमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक स्कीम्स, दिवाळी ऑफर्स आणि नवनवीन दागिन्यांच्या डिझाईन्सची रेलचेल आहे. शुद्धतेची खात्री, पारदर्शक व्यवहार आणि विश्वास या तीन कारणांमुळे ग्राहक भंगाळे गोल्डकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि येणाऱ्या सणांच्या मागणीमुळे पुढील आठवड्यात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




