गुलाब भू च मंत्री होणार !” – सर्व सामन्यांच्या भावना
नांदेड, साळवा, रोटवद भागात गुलाबभाऊंची जंगी रॅली : ग्रामस्थांचा उत्साह व उदंड प्रतिसाद
धरणगाव / जळगाव -नांदेड, साळवा, रोटवद आणि परिसरातील गावागावात नुकताच गुलाबराव पाटील यांचा जंगी प्रचार दौरा पार पडला. जंगी रॅलीत हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होत असल्याने “भाऊंनी आपल्या माणसांसाठी अहोरात्र झटून काम केलेय” – असे सांगत अनेक ग्रामस्थांच्या मनातला विश्वास दृढ झाला आहे. त्यांच्या कार्यामुळेच प्रत्येक गावांमध्ये पाणी आणि रस्त्यांची सोय झाली. वारकरी संप्रदायाच्या सेवा-भावनेला त्यांनी नेहमीच मान दिला, आणि याच कार्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत त्यांची ओळख एक खंबीर, कर्तव्यनिष्ठ नेत्याची बनली आहे. प्रचारा दरम्यान सर्वसामन्याच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक हाकेत आणि प्रत्येक जयघोषात, जनतेच्या मनातला विश्वास झळकत होता – “गुलाब भू च मंत्री होणार ! अश्या भावना भावना सर्व सामन्याच्या बोलून दाखविल्या.
यांची होती उपस्थिती
प्रचार रॅलीत माजी महापौर ललितभाऊ कोल्हे, भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, सुभाषअण्णा पाटील, माजी जि. प. सदस्या माधुरीताई अत्तरदे, पुष्पाताई पाटील, कल्पनाताई अहिरे, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील सर, मुकुंदराव नन्नवरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील , निर्दोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामकांत पाटील, नाटेश्वर पवार, सेनेचे तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, भाऊसाहेब पाटील, दामूअण्णा पाटील, गजानन पाटील, प्रेमराज पाटील, प्रेमराज बापू पाटील, सचिन पवार, चंदन पाटील, प्रमोद पाटील, जगदीश पाटील, सरपंच विनोद पाटील, गोंदेगाव – मोतीआप्पा पाटील, रोहिदास पारधी, साळवा – संजय नारखेडे, चंद्रकांत वाणी, प्रल्हाद कोल्हे, संजय कोल्हे, मनोज अत्तरदे , गिरीश वानखेडे, मोरू बोरोले, रोटवद- सुदर्शन पाटील, भगवान पाटील, रामभाऊ पाटील, मोहन शिंदे, उदय पाटील, नांदेड – भारत सैंदाणे, प्रशांत अत्तरदे, सुधाकर पाटील, शरद पाटील, विशाल पाटील, जगतारव पाटील, अनंतराव पाटील, रंगराव पाटील, फारुख पटेल, शाहरुख पटेल, निशाणे यांच्यासह निशाणे, बु., पिंपळे, गोंदेगाव, रोटवद, साळवा, साकरे, नांदेड व कंडारी परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘धनुष्यबाणाला’ प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करीत होते.
धरणगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा व आजचा दौरा
शिरसोली प्र. बो. -स. ८.०० वा, व शिरसोली प्र.न. – स. १०.०० वा, रामदेववाडी येथे दुपारी १२.०० वाजता प्रचारआहे .
महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगाव येथे आठवडे बाजारात सायंकाळी ६.०० वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी मार्फत करण्यात आले आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व गुलाबराव पाटील काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे..