गुलाबराव पाटलांनी सर्वच काढले.. विरोधकांना धू-धू धुतले!
पाळधी येथे विजय गर्जना सभा, सभेला नागरिकांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । देवकर अप्पा हे जामिनावर आहे, मी जमिनीवर आहे. मी ज्यादिवशी सर्वोच्च न्यायालयात जाईल ना तेव्हा वारी निश्चित आहे, मात्र मला ते काम जमत नाही. आज या मतदारसंघात मी जे-जे कामे केली आहेत ना तेवढी कुणीच केली नाही. रमेश माणिकराव पाटलाने ५२ योजना घेतल्या आहेत. तुम्ही जसे चालणार ना, मी तसंच वागणार आहे. आता माझी सटकली आहे. मला स्वभावात बदल करावाच लागणार आहे. २३ तारीख होऊन जाउडे मग मी दाखवतो काय आहे. दिलीप बापूंच्या सर्व मालमत्ता लिलावात आहे मात्र मी कधीही त्यात हात घातला नाही. माझी ही वेळ जाऊ द्या मग मी बघतो, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.
शिवसेना महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी पाळधी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधताना ते बोलत होते. पाळधी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणावर आयोजित सभेला नागरिकांनी भरभरून गर्दी केली होती. गुलाबराव पाटील यांनी भाषणाला सुरुवात करताच फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
मी सर्व जाती, धर्माचा आहे
प्रत्येक निवडणुकीला शेवटची सभा पाळधीला घेत असतो. गेल्या पंचवार्षिकला पाळधीतून मला १० हजार मते होती. गावांसाठी मी जे केले त्यापेक्षा जास्त प्रेम गावाने मला दिली. सध्या माझ्यावर जातीपातीचे आरोप केले जात आहेत. देवकर आप्पा तुम्हाला सर्वाधिक मते दोनगावने दिली परंतु मी सर्वात जास्त त्या गावात कामे केली. मी जातीवादी असतो तर गावाचे नंदनवन केलेच नसते. माझ्यावर खालच्या पातळीची टीका केली जाते आहे, तुम्ही मला निवडणुकीत हातावर मात्र खालच्या पातळीचे शब्द वापरू नका. माझी ओपीडी सकाळी ८ वाजता सुरू होते तेव्हा मी जात, पात पाहत नाही. मुंबईत माझा कार्यकर्ता केव्हाही येऊ शकतो. तो सर्वांसाठी खुला आहे. मी सर्व जाती, धर्माचा आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
माझ्यामुळे देवकर बँकेत चेअरमन झाले
गुलाबराव पाटील रेतीवाल्यांच्या मागे राहतो असा आरोप देवकरांनी केला. बांभोरी गाव रेतीच्या किनाऱ्यावर आहे, गाढवावरून तिथे रेती वाहतूक होत होती. देवकर त्यांना रोजगार देऊ शकले नाही. पंढरपुरी शरद कोळी माझ्यावर टीका करतो. अरे आमचे बांभोरीचे कोळीच तुला उत्तर देऊन टाकतील, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. मी मतदारसंघातील अनेकांना अनेक पदे दिली, अनेक पदांवर बसविले. कधीही जात पाहिली नाही. गुलाबराव देवकरांना ७ मते मी दिले म्हणून ते चेअरमन झाले, असा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला.
देवकर माझ्यासोबत वर्षावर आले होते
माझ्यासोबत १ महिन्यापूर्वी ते वर्षावर आले होते, केस दाबा म्हणत होते. मीच बोललो लढू द्या यांना निवडणूक. पाळधीमध्ये ८ दिवसांनी पाणी येते म्हणे, इथला चेहरामोहरा बदलवला म्हणून ३-४ दिवसात पाणी येऊ लागले. दवाखान्याचे अनेक काम नागरिकांचे मी केले. माझ्याकडे येणाऱ्याची मी कधीही जात पाहिली नाही, आप्पा तुम्ही काय काम केले ते सांगा? तुम्ही कुटुंबावर टीका केली मात्र आम्हाला ते जमत नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
गुलाबरावांनी मतदारांना केले आवाहन
आजची सभा संपली की सर्वांनी आपले गाव सांभाळायचे आहे. रात्र वैऱ्याची आहे. देवकर आप्पा गरीब असल्याचे नाटक करतात. येत्या २० तारखेला आपण सर्वांनी मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी रॉ.का.चे जिल्हाय्ध्यक्ष संजय पवार , भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे निलेश पाटील , रिपाईचे अनिल अडकमोल, पी.सी.आबा पाटील, गोपाल बापू चौधरी, मुकुंदराव नन्नवरे, डी.ओ.पाटील, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, सुभाष पाटील, निर्दोष पवार, नातेश्वर पवार,दिलीप भाऊसाहेब पाटील, दामू अण्णा, संजय पाटील, आबा धोबी, अनिल झंवर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, परिसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.