शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
जळगाव प्रतिनिधी-शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आज नागपूर येथील राजभवन येथे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल सी.पी .राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
गुलाबराव पाटील यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली असून त्यांना कोणते खाते मिळते याची उत्सुकता जळगाव जिल्हा वासियांना लागून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा नागपूर येथे आज पहिला शपथविधी पार पडला यात 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दोन वेळा पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री खाते त्यांनी सांभाळले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात येईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव ग्रामीण मतदार संघासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.