Politics

अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर.

ग्रामपंचायत निवडणुकीची बिगुल अखेर वाजणार..

अमळनेर | प्रतिनिधी | 08 जुलै – अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले. आज दुपारी 2 वाजेला सरपंच पदासाठी तसेच दुपारी 4 वाजेला महिला सरपंच पदासाठी आरक्षण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

तहसीलदार रुपेश कुमार खुराणा यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर तालुक्यातील 106 ग्रामपंचायतीचे अनु. जाती, अनु. जमाती, ना. मा प्र व सर्वसाधारण या प्रवर्गातील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.

तसेच एकूण 119 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीला ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी व इच्छुक उमेदवार आरक्षण जाहीर सभेत उपस्थित होते.

आता सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामपंचायत रणधुमाळी साठी इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button