Social
बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनतर्फे हनुमान चालीसा पठण
महा पोलीस न्यूज | २४ एप्रिल २०२४ | बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनतर्फे हनुमान जयंती निमित्त शहरातील तांबापुरा भागात व समता नगरात हनुमान चालीसा पठण व पाचशे हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपाच्या कामगार मोर्चाच्या प्रदेश सचिव सुधा काबरा, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, कामगार मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सचिव कुमार सिरामे, महापालिकेचे डॉ. विकास पाटील, कामगार मोर्चाचे सदस्य राजेश शर्मा, गोपाळ हटकर, यांसह मान्यवर उपस्थित होते.
सकाळी साडेदहा वाजता तांबापुरा भागातील हनुमान मंदिरात डॉ. विकास पाटील यांच्या हस्ते हनुमानाची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मोफत हनुमान चालीसा पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यानंतर परिसरातील नागरिकांनी रक्तदान केले. शिबीरात चौदा जणांनी रक्तदान केले.
दुपारी साडेचार वाजता समता नगरातील नागेश्वर मंदिरात आरती व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी देखील हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. परिसरातील महिलांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.