पोलिस अधीक्षकांच्याहस्ते हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द

पोलिस अधीक्षकांच्याहस्ते हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द
यवतमाळ प्रतिनिधी
मुख्यमंत्री यांचे 100 दिवसांचा कृती आराखडा तसेच पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे ऑपरेशन प्रस्थान या समाजीक उपक्रमा अंतर्गत हरवलेले तसेच गाळ झालेले महागडे मोबाईल आज मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.
आज18 रोजी सकाळी 10/30 वा. अवधुतवाडी, यवतमाळ येथे . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे 100 दिवसांचा कृती आराखडा तसेच . पोलीस अधिक्षक यांचे ऑपरेशन प्रस्थान या समाजीक उपक्रमा अंतर्गत पो.स्टे. चे हद्दीत जनतेचे हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल यांचा अवधुतवाडी येथील पोलीस पथकाने शोधून काढलेले विविध कंपनिचे एकुण 33 महागडे मोबाईल किं.अं. 6,50,000/- रू. चे मोबाईल .पोलीस अधिक्षक सा.यवतमाळ यांचे हस्ते सुपूर्त करण्यात आले. मुळ मालकांना मोबाईल सुपूर्त केल्यानंतर मोबाईल धाकांनी त्यांचे मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करून पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
पोलीस अधिक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधिक्षक श्री. पियुष जगताप . उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अवधुतवाडी चे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर, पोहवा/आशिष भुसारी, पोहवा/गजानन दुधकोहळे, पोहवा/बलराम शुक्ला, पोशि/योगेश चोपडे पो.स्टे. अवधुतवाडी यांनी पार पाडली.