Crime

नदीत उतरून थेट कारवाई! वडनगरीत अवैध वाळू उपशावर प्रांताधिकाऱ्यांचा धडक छापा, यंत्रे-जाळे उद्ध्वस्त

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अवैध वाळू उपशावर आक्रमक भूमिका घेत विनय गोसावी, प्रांताधिकारी जळगाव यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे सकाळपासून खबरी ठेवत थेट नदीत उतरून मोठी कारवाई केली. वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र व दोर ताब्यात घेत अवैध उपसा उध्वस्त करण्यात आला.

या कारवाईत प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह मंडळ अधिकारी छाया कोळी, ग्राम महसूल अधिकारी बडगुजर, महसूल सहाय्यक तेजस सपकाळे, वडनगरी पोलीस पाटील यांचा समावेश असलेल्या पथकाने अचानक छापा टाकला. तब्बल ३ तासांच्या प्रतीक्षेनंतर कारवाई पूर्ण करत दोर व इतर साहित्य नष्ट करण्यात आले.

जप्त केलेली सर्व यंत्रसामग्री प्रांताधिकाऱ्यांनी स्वतःच्या शासकीय वाहनातून प्रशासकीय इमारतीत जमा केली. पुढील कारवाईसाठी गावातील पोलीस पाटील व तरुणांना सतर्क राहण्याच्या सूचना देत, अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने आल्यास तात्काळ कार्यवाहीचे नियोजन करण्यात आले आहे.

अचानक आणि कठोर कारवाईमुळे परिसरात वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या धडक पावलाने अवैध धंद्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button