जळगावात पुन्हा ट्रॅक्टरने घेतला बळी, जिप सीईओ यांची धाव!

महा पोलीस न्यूज । दि.८ जानेवारी २०२४ । जळगाव शहरात वाळू माफियांचा हैदोस थांबत नसून आज देखील एक भरधाव ट्रॅक्टरने एकाचा बळी घेतला आहे. रात्री ९ वाजे वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंप पुलावर हा अपघात झाला असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित हे घटनास्थळी उपस्थित असल्याने त्यांनी तातडीने मदत मागवली.
मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी शहराकडून जळगाव शहराकडे येत असलेल्या महामार्गावर दादावाडी उड्डाण पुलावर काही महिन्यांपूर्वी एका महिला आणि चिमुकलक्याला जीव गमवावा लागला होता. आज नववर्षात देखील पुन्हा एक अपघात झाला असून त्यात एकाला जीव गमवावा लागला आहे.
घटनास्थळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित हे घटनास्थळी हजर असल्याने त्यांनी लागलीच रुग्णवाहिकेला फोन केला. लागलीच रुग्णवाहिका दाखल झाली आणि त्यांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तो मयत झाला असल्याचे समजते. पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अगोदर जिल्हा परिषद अधिकारी पोहचले होते.