चोपड्यात 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

चोपडा| मिलिंद वाणी : चोपडा तालुक्यात 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल भुसारे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मानवंदना दिली.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष श्री. अरुणभाई गुजराथी, माजी आमदार श्री. कैलास पाटील, श्री. दिलीपराव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. नरेंद्र पाटील, माजी उपनगर अध्यक्ष श्री. जीवन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब घोलप, गटविकास अधिकारी श्री. अनिल विसावे, चोपडा शहर पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे, ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. महेश टाक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. विरेंद्र राजपूत, मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री. दिपक साळुंखे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर महसूल विभागाने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि आदेशांचे वाटप केले.
प्रमुख योजनांचे वाटप आणि सन्मान
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि आदेशांचे वाटप करण्यात आले. यामध्ये:
* शेतसुलभ योजना: मालखेडा गावातील नागरिकांना या योजनेचे आदेश वाटप करण्यात आले.
* अतिक्रमित रस्ता मोकळा केल्याबद्दल सन्मान: चौगावचे ग्राम महसूल अधिकारी श्री. भूषण पाटील यांचा अतिक्रमित शेतरस्ता मोकळा केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
* उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी गौरव: महसूल सप्ताहादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
* छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान: या अभियानांतर्गत १० उत्पन्न, १० जातीचे आणि १० नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
* घरकुल योजना: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ५ लाभार्थ्यांना घरकुलासाठी आदेश वाटप करण्यात आले.
* संजय गांधी निराधार योजना: या योजनेच्या २० लाभार्थ्यांना आदेश देण्यात आले.
* अन्नसुरक्षा योजना: पाच दिव्यांग लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे केंद्र प्रमुख श्री. देवेंद्र पाटील यांनी केले. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन व वादन विवेकानंद विद्यालय आणि कस्तुरबा विद्यालय, चोपडा यांच्या विद्यार्थ्यांनी केले.






