सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे तिरंगा मोटार सायकल रैली

जळगांव (प्रतिनिधी) : दरसाला बाद प्रमाणे यंदाही भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे 1997 सालापासून अखंडपणे सुरु असलेली राष्ट्रीय एकात्मता तिरंगा मोटार सायकल रैली चे आज स्वातंत्र्य दिनी दि. 15/08/2025 शुक्रवारी उत्साहात आयोजन करण्यात आले.
रैली ची सुरवात हिंदू धर्मगुरू पंडित लक्ष्मण भगत महाराज, मुस्लिम धर्मगुरू मुजावर फैय्याज बाबा, शीख धर्मगुरू ग्यानी नितेश सिंग, ख्रिश्चन धर्मगुरू फादर शशिकांत दळवी, बुद्ध धर्म गुरु भन्ते एन. आनंद महाथेरो या सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. या रैलीचे नेतृत्व सै. अयाज अली नियाज अली यांनी केले.
या रैलीत सामील सर्व लोकांच्या हातात तिरंगा ध्वज होते. या प्रसंगी ” जशने यौमे आझादी झिंदाबाद, हिंदुस्थान झिंदाबाद, भारतीय स्वतंत्रता दिवस चिरायू होवो, हम सब एक है, जय हिंद जय भारत अशा विविध जोरदार घोषणा देऊन संपूर्ण रैली चा मार्ग दणाणून सोडण्यात आला. रैली ची सुरवात सकाळी ठीक 10:00 वाजता भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात होऊन पुढे घाणेकर चौक, टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे चौक, नेरी नाका चौक, तरुण कुढापा चौक, रथ चौक, दधीची चौक, येथून परत भिलपुरा येथील इमाम रझा चौकात सकाळी 11:00 वाजे दरम्यान येऊन राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, योगेश मराठे, सय्यद उमर, नंदकुमार वाणी, काशीफ अब्दुल सलाम, कामिल खान, रवींद्र खैरनार, नितीन शिंपी, शफी ठेकेदार, उमर काकर, रवी सुरडकर,शेख मसूद, झुबेर रंगरेझ, अबुल जुम्मन, हाजी शेख सलीमुद्दीन, मनोज जैन, हाजी शकुर बादशाह, शेख नूर मोहम्मद, झिशान हुसैन, तनवीर लतीफ, इलियास बागवान, ओवेश हुसैन, अब्दुल रहेमान, शेख नझीरूद्दीन, आसीफ साबीर, शेख अल्तमश, अयान अलीम, शेख कलीम यांसह अनेक सदस्य उपस्थित होते.






