HealthSocial

ओम योगा क्लासतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

महा पोलीस न्यूज । दि.२३ जून २०२५ । महाबळ कॉलनीतील ओम योगा क्लासच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने जळगावच्या लांडोरखोरी वन उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगासनांचे महत्त्व, आपल्या आरोग्यासाठी जागरूकता, सकारात्मकता याविषयी सामाजिक जनजागृती हा यामागचा उद्देश होता.

विशेषतः योगासनांनी मिळणारे सुदृढ शरीर आणि मन याचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या नित्यक्रमात योगासनांचा समावेश करावा, याविषयी योगशिक्षिका पल्लवी उपासनी आणि सोनाली पाटील यांनी मार्गदर्शन केले. ओम योगा क्लासच्या सर्व योगसाधकांद्वारे विविध योगासनांची शृंखला अतिशय शिस्तबद्ध आणि मनोहरी पद्धतीने सादर करून आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी पल्लवी उपासनी, सोनाली पाटील याच्यासह ओम योगा क्लासच्या सर्व योगसाधकांनी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button