जैन चैलेंज चषक जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
महा पोलीस न्यूज | १४ फेब्रुवारी २०२४ | जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन दिनांक १२ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या स्पर्धांमध्ये ११ आणि १४ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुलींचे एकूण ३९ संघांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंह, दीपिका ठाकूर आणि चाळीसगाव चे बॅडमिंटन प्रशिक्षक अमोल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
स्पर्धे साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी मुख्य पंच म्हणून तर दीपिका ठाकूर, सुफयान शेख, मलय लोडाया, अक्षत पागरिया, पुनम ठाकुर, फाल्गुनी पवार,ओम अमृतकर, कोनिका पाटील, ओवी पाटील, तनिषा साळुंखे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
अंतिम निकाल
११ वर्षाआतील मुले –
प्रथम स्थान:- जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, जळगाव
द्वितीय स्थान:- रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, जळगाव
तृतीय स्थान:- पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव
११ वर्षाआतील मुली –
प्रथम स्थान:- किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, जळगाव
द्वितीय स्थान:- रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल संघ (A), जळगाव
तृतीय स्थान:- रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल संघ (B), जळगाव
१४ वर्षाआतील मुले –
प्रथम स्थान:- सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल, जळगाव
द्वितीय स्थान:- काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव
तृतीय स्थान:- गुडशेफर्ड अकॅडमी, चाळीसगाव
१४ वर्षाआतील मुली –
प्रथम स्थान:- पोदार इंटरनॅशनल स्कूल, चाळीसगाव
द्वितीय स्थान:- महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय , जळगाव
तृतीय स्थान:- गुडशेफर्ड अकॅडमी, चाळीसगाव
या स्पर्धेतील विजेते शाळांचे संघाना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावचे अध्यक्ष अशोक जैन आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या.