Crime

जळगाव जिल्ह्यातील सरकारी वकिलांची नोटरी पदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यातील सरकारी वकिलांची नोटरी पदी नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत असलेल्या जिल्हा सरकारी वकील आणि काही सहाय्यक सरकारी वकिलांची भारत सरकारमार्फत नोटरी पब्लिक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तींमुळे जिल्ह्यातील न्यायिक सेवांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे.

जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र गणपतलाल काबरा हे २००७ पासून सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत असून, नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची जिल्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता केंद्र सरकारकडून त्यांची अधिकृतपणे नोटरी पब्लिक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच सहाय्यक सरकारी वकील रमाकांत ताराचंद सोनवणे, निलेश दयाराम चौधरी, भारती जगन्नाथ खडसे आणि वैशाली सुकलाल महाजन यांचीही नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे सर्व वकील २०१५-१६ पासून जिल्हा सत्र न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button