CrimeSocial

कुत्र्यांच्या नरकयातना टळणार : प्राणीमित्र जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकाराने गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज | १ मार्च २०२४ | जळगाव शहर मनपाने शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्था नंदुरबार यांना मक्ता देण्यात आला आहे. संरक्षणम् गो व पशू सेवा संस्था यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणीच्या सूचना केल्या होत्या. पाहणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.अनिल शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव महानगरपालिकामार्फत नियुक्त नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्था नंदुरबार यांच्या कामकाजाच्या चौकशी बाबत जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगाव यांना संस्थेच्या विरोधात प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अर्ज प्राप्त झाल्याने आम्ही सदर अर्जाची चौकशी केली. सदर संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर गौतम अनिल शिरसाठ हे आहेत. दि.२६ डिसेंबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मी व डॉ.मनिष बाविस्कर, पशुधन विकास अधिकारी भादली, डॉ.निलेश चोपडे, पशुधन विकास अधिकारी जळगाव असे आम्ही सकाळी १० वाजता कार्यालयीन वेळेत वेळोवेळी मेहरुण शिवारातीलल जुना टि.बी हॉस्पीटल जागेवर नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्था नंदुरबार यांच्या मार्फत चालविण्यात येणा-या श्वानांचे अँनीमल बर्थ कंट्रोल युनिट येथे भेट देवून चौकशी केली.

चौकशी दरम्यान अँनीमल बर्थ कंट्रोल युनिटमधील बरेच पिंजरे हे तुटलेल्या अवस्थेत आढळले असून ते श्वानांना ठेवण्यास अयोग्य आहे. तसेच पिंजरे ज्या खोल्यांमध्ये ठेवले आहे त्या खोल्यांना व्हेन्टीलेशन उपलब्ध नाही. प्रत्यक्ष चौकशी दरम्यान श्र्वानांना पुर्ण वेळ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. अँनीमल बर्थ कंट्रोल रुल्स २०२३ नुसार ऑपरेशन थेटरमध्ये नमूद सुविधा पुरेशा नाहीत. रेकॉडची तपासणी केली असता दि.२ व १० फेब्रुवारी रोजी ऑपरेशन झालेल्या श्वानांना किमान चार दिवस औषधोपचार करणे आवश्यक असतांना तिसऱ्या दिवशी सोडून दिल्याचे दिसते. अँनीमल बर्थ कंट्रोल रुल्स २०२३ दि.१० मार्च २०२३ नुसार अँनीमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचेकडुन प्रोजेक्ट रेकग्नीशन सर्टीफीकेट सदर नवसमाज निर्माण बहुउदेशीय संस्थेने सहा महिन्याच्या आत प्राप्त करुन घेणे आवश्यक होते. अँनीमल बर्थ कंट्रोल रुल्स २०२३ क्लॉझ नंबर ५ नुसार सदर संस्थेने प्रोजेक्ट रेकग्नीशन सर्टीफीकेट प्राप्त करुन न घेता अँनीमल बर्थ कंट्रोल केंद्र सुरु ठेवले आहे.

दि.१४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या भेटीच्या वेळी दि.१३ रोजी २६ शस्त्रक्रिया केल्याची नोंद असून सीसीटिव्ही फुटेज क्रमांक १ मध्ये १५ शस्त्रक्रिया केल्याचे दिसून ये येत आहे. उर्वरित शस्त्रक्रियाचे फुटेज क्रमांक २ मध्ये उपलब्ध असल्याचे प्रोजेक्ट डायरेक्ट यांनी सांगितले परंतु ते फुटेज अस्पष्ट होते. म्हणून माझी नवसमाज बहुउदेशीय संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर गौतम अनिल शिरसाठ याचे विरुध्द जिल्हधिकारी जळगाव व जिल्हापशुसंवर्धन यांचे आदेशाने मी फिर्याद आहे. चोपडा सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.अनिल शिंदे यांनी फिर्याद दिल्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गौतम अनिल शिरसाठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सचिन पाटील करीत आहेत.

जळगावातील संरक्षणम् गो व पशू सेवा संस्थेच्या ऍड.अंजली केदार भुसारी यांनी दि.१३ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत तक्रार केली होती. तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत पोलीस आणि पशू वैद्यकीय अधिकारी, मनपा अधिकारी यांना पाहणीच्या सूचना केल्या होत्या. पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले होते. संरक्षणम् गो व पशू सेवा संस्थेकडून करण्यात आलेला पाठपुरावा आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कुत्र्यांच्या नरकयातना टळणार आहे. तसेच भविष्यात त्यांना चांगला उपचार आणि सुविधा मिळतील अशी अपेक्षा प्राणी तज्ञ, प्राणी प्रेमी व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button