जुन्या वादातून एकमेकांवर धारदार शस्त्राने वार: तीन गंभीर
जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील घटना
जळगाव:-जुन्या भांडणाच्या कारणावरून तालुक्यातील आव्हाने येथे दोन गट मध्ये वाद झाल्याने यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना 18 रोजी सकाळी नऊ वाजता घडली असून या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला 16 जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या फिर्यादीत सुप्रिया सोपान पाटील यांनी म्हटले आहे की 18 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता गावात जुन्या वादातून त्यांचा दीर योगेश पाटील याला गावातील घनश्याम पाटील, सचिन पाटील ,प्रदीप पाटील, सुनीता पाटील, यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच प्रदीप पाटील याने हातातील धारदार शस्त्राने वार करून जखमी केले हे भांडण सोडवण्यासाठी केलेल्या सुप्रिया पाटील व त्यांचे नातेवाईक समाधान पाटील यांना देखील मारहाण केली अशी फिर्याद दिली आहे. दुसऱ्या गटातील फिर्यादीत घनश्याम पाटील यांनी म्हटले आहे की जुन्या भांड्याच्या कारणावरून योगेश पाटील त्याचे नातेवाईक गोपाल पाटील ,सोपान पाटील ,समाधान पाटील, किरण पाटील, नवल पाटील, गोपाल पाटील ,अरुण पाटील इंदुबाई पाटील सुप्रिया पाटील ,मिनाबाई पाटील, सिंधुबाई पाटील ,सर्व राहणारा आव्हाने तालुका जळगाव यांनी चहाच्या दुकानावर दगडफेक करून इतरांनी कुऱ्हाड ,लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने पाटील व त्यांचा मुलगा सचिन पाटील याला बेदम मारहाण करून दुखापत केल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.