Crime

डंपरच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार ; जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथील घटना

जळगाव प्रतिनिधी;– गेल्या दोन दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळ एका डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत तालुक्यातील घार्डी येथील दोन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पंकज शंकर कोळी (वय 26) आणि कृष्णा उर्फ अमोल आनंदा कोळी (वय 27 दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) असे मयत तरुणांची नावे आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पंकज कोळी आणि अमोल कोळी हे दोन्ही जळगाव तालुक्यातील घार्डी येथील रहिवासी असून ते सेंट्रींग काम करून आपला उदरनिर्वाह करतात. आज 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते दुचाकी क्रमांक (एम एच 19 – एबी 34 46) ने घरी गावाकडे जात असताना डंपर (क्रमांक एमएच 19- झेड 8067) समोरून जोरदार धडक दिल्याने पंकज आणि अमोल हे दोघे ठार झाले. घटनेची माहिती कळतात नागरिकांचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

पंकज कोळी यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार असून अमोल कोळी यांच्या पश्चात पत्नी दीड वर्षाची मुलगी व आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. घटनेची माहिती कळताच गावात शोक काळा पसरली आहे. दरम्यान याबाबत उशिरापर्यंत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button