Crime

ब्रेकिंग : जळगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा, ४५ नागरिकांवर गुन्हे, तपास अंतिम टप्प्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील बहुचर्चित जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ४५ जणांना संशयीत आरोपी बनवले असून, त्यात ४३ अर्जदार आणि दोन वकील/एजंट यांचा समावेश आहे. या सर्वांनी बनावट कागदपत्रे वापरून, खोटे आदेश तयार करून आणि त्यावर तहसीलदार, जळगाव यांच्या बनावट सह्या घेऊन महानगरपालिकेकडून जन्म प्रमाणपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यामध्ये बांगलादेश कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांनी यापूर्वीही जळगावला भेट देऊन काही पुरावे सादर केले होते आणि नुकत्याच झालेल्या दौऱ्यात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन उर्वरित ४३ जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही केली आहे.

या ४३ संशयीत आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४६७, ४६८ आणि ४७१ (बनावट कागदपत्रे तयार करणे व वापरणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणामुळे काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. गुन्ह्यात हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल येणे बाकी असून त्यानंतर चार्ज शिट दाखल करण्यात येईल, अशी माहिती तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी दिली आहे.

संशयीत आरोपींची नावे :
शिरीष बानो फारीक शाह, आरीफ खान इसा खान, बान असुदुल्ला खान हाफीज, शाह आसिफ अहमद, शमशेर बेग तुराब वेग, तौसीफ शहा जनिउल्ला शाहा, तुराब वेग गुलाब वेग, शहनाज वी. शेख मुनीर, वाहेदाबी अब्दुलगनी, अब्दुल्ला असगर अली सैय्यद, नुसरत बानो, जबीउल्ला शाहा, शाहा आयाज अहमद अब्दुल अजीज, मोहम्मद वसीम जबीमुल्ला शाहा, मोहम्मद जफर जवीउल्ला शाहा, जनीक परवीन अमानउल्ला शाहा, बिसमिल्लाह खान, शेख सलीम शेख बसीर, शेख अनीस शेख बसीर, मोहम्मद अकील शेख बसीर, मोहम्मद कलीम शेख बसीर, शरीफ नईमोद्दीन, मोहम्मद शकील शेख बसीर, अमरीन रशिद पटेल, जाकीर फकीर मोहम्मद तांबोळी, तबस्सुम परवीन मोहम्मद इकबाल, शेख मोहम्मद इकबाल अब्दुल रहीम, राहत नाज जबीउल्ला शाहा, अंजुमबी शेख फरीद, तसलीमा बी शेख यासिम, शोहरत अली शरीफ मुनसारी, शेख शानदोस शेख ईसाक, चांद मोहम्मद प्यारजी बागवान, असलम खान सादीक खान, अशफाक बुढान बागवान, कनिज रज्जाबी अब्दुलगनी, बुशरा खान मोहम्मद इस्लाउद्दीन, मोहसीन चांद मोहम्मद, निगार सुलताना हफिज खान, समीर खान आयुब खान, नसरिन बानो आयुब खान, अफजलखान अय्युब खान, नदिमखान हफिजखान.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button