
महा पोलीस न्यूज । दि.२ सप्टेंबर २०२५ । सुवर्ण आणि हिरे दागिन्यांच्या चाहत्यांसाठी जळगावात एक अनोखी मेजवानी सजली आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रस्तुत ‘द फर्स्ट लूक’ हे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन २ ते ४ सप्टेंबर दरम्यान काव्य रत्नावली चौकातील ओंकार लॉन्स येथे भरणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
या प्रदर्शनात विविध नवनवीन डिझाईन्सची झलक पाहायला मिळणार आहे. द मिनी एडिट, द मेटल अँड मेटल, द कलर कोड, द रॉयल रिव्हायव्हल आणि द फेदरलाईट यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण कलेक्शन्स यावेळी प्रथमच जळगावकरांसाठी उपलब्ध होणार आहेत. आधुनिक डिझाईन, पारंपरिक सौंदर्य आणि कल्पक कलात्मकता यांचा सुंदर संगम प्रत्येक कलेक्शनमध्ये अनुभवायला मिळेल.
“हे प्रदर्शन जळगावकरांसाठी केवळ दागिन्यांची खरेदी करण्याची संधी नाही, तर एक वेगळा अनुभव आणि अविस्मरणीय आठवण ठरणार आहे,” असा विश्वास रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे भागीदार सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी व्यक्त केला आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने जळगावच्या सुवर्णजगतात एक नवा अध्याय सुरू होत असून, दागिन्यांमधील कलात्मकता, गुणवत्ता आणि नावीन्य या तिन्ही गोष्टींचा मनमोहक मिलाफ ग्राहकांना अनुभवायला मिळणार आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






