जळगाव जिल्हा पोलीसदलात खांदेपालट, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीसदलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा अध्याय संपल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली नुकतेच करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत.
| अ. क्र. | पोलीस अधिकारी यांचे नांव / पदनाम | सध्याची नेमणूक पोस्टे/शाखा | नवीन नेमणूक पोस्टे/शाखा|
| १ | पोनि/बबन मारुती आव्हाड | स्थागुशा जळगाव | प्रभारी एमआयडीसी |
| २ | पोनि/संदिप भटु पाटील | एमआयडीसी | प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव |
| ३ | पोनि/कावेरी महादेव कमलाकर | चोपडा ग्रामिण | प्रभारी शनिपेठ |
| ४ | पोनि/दत्तात्रय युवराज निकम | अमळनेर | प्रभारी अमळनेर |
| ५ | पोनि/रंगनाथ त्र्यंबक धारबळे | शनिपेठ | प्रभारी यावल |
| ६ | पोनि/प्रदिप खंडू ठाकुर | यावल | प्रभारी जिल्हापेठ |
| ७ | पोनि/सुनिल हंसराज पवार | पारोळा | नियंत्रण कक्ष, जळगाव |
| ८ | पोनि/सचिन सिताराम सानप | पहुर | प्रभारी पारोळा |
| ९ | सपोनि/प्रमोद रामकृष्ण कठोरे | आगुशा | प्रभारी पहुर |
| १० | सपोनि/जनार्दन एकनाथ खंडेराव | वरणगाव | यावल |
| ११ | सपोनि/अमितकुमार प्रतापसिंग बागुल | भुसावळ बाजारपेठ | प्रभारी वरणगाव |
| १२ | सपोनि/प्रकाश राधाकिसन काळे | पिंपळगाव हरेश्वर | जळगाव शहर |
| १३ | सपोनि/कल्याणी राजेश वर्मा | जळगाव शहर | प्रभारी पिंपळगाव हरेश्वर |
| १४ | पोउनि/सोपान रमेश गोरे | पाचोरा | स्थानिक गुन्हे शाखा |
हे बदल प्रशासकीय कारणावरून करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि जनहित जपणे हा त्यामागचा उद्देश आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.