महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील या ,त्रिमूर्तींची कॅबिनेट मंत्रीपदी लागणार वर्णी !
जळगाव विशेष प्रतिनिधी=महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ने घवघवीत यश संपादन केले. मात्र निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या वादावरून अनेक दिवसांचा अवधी लोटला गेला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून होते.
मात्र अखेर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद शमला. परंतु मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे गृह खाते शिवसेनेला मिळावे यासाठी आग्रही असल्याने व त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात व्यक्त होत होत्या. मात्र भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. परंतु मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला किती मंत्रिपदे द्यावी आणि कोणती याबाबतचा अंतर्गत वाद सुरू होता.
मात्र यावर वरिष्ठांनी तोडगा काढून अखेर आज नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्री पदाचा शपथविधी सोहळा राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.. जिल्ह्यातील महायुतीचे जेष्ठ नेते गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अमळनेरचे आमदार अनिल पाटील या तिघांची पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी निश्चितच वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या तिघांना कोणते खाते मिळते याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान जिल्ह्यात महायुतीचे 11 आमदार निवडून आले असून यात कॅबिनेट मंत्रीपदी ज्येष्ठ भाजप नेते गिरीश महाजन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांच्या व्यतिरिक्त राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात राज्यमंत्रीपदी तीन वेळा निवडून आलेले आमदार राजू मामा भोळे, किशोर पाटील, आणि संजय सावकारे यांची देखील वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आज उपराजधानी नागपुरात दुपारी ४ वाजता ३५ ते ४० मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनही रविवारीच नागपुरात दाखल होत आहेत.
महायुतीत २१, १२, १० असा मंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यानुसार, रविवारी भाजपचे १७ ते १८, तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या कोट्यातील सर्व मंत्री शपथ घेऊ शकतात, तर भाजप आपल्या कोट्यातील २ ते ३ मंत्रीपदे रिक्त ठेवेल,
कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार?
भाजप गृह, अर्थ किया महसूल, ऊर्जा, जलसंपदा, जलसंधारण, उच्च व तंत्रशिक्षण, ग्रामविकास, पर्यटन, आदिवासी विकास, वने, सास्कृतिक कार्य, कौशल्य विकास, आरोग्य वैद्यकीय शिक्षण, बहुजन कल्याण विकास, सामाजिक न्याय, रोहयो, फलोत्पादन, सामान्य प्रशासन, विधी व न्याय
शिवसेना नगरविकास, जलसंपदा किंवा एमएसआरडीसी, उद्योग, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, शालेय शिक्षण, पणन,
राष्ट्रवादी-अर्थ किंवा सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, सहकार, कृषी, महिला व बालकल्याण, आदिवासी किंवा अन्न व औषधी प्रशासन, मदत पुनर्वसन, कीडा व युवक कल्याण
पक्षनिहाय मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावे
भाजपा: चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, विजयकुमार गावित, आशिष शेलार किया योगेश खगर, संभाजी निलंगेकर, संजय कुटे, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राहुल आहेर, गोपीचंद पडळकर, नितेश राम, राहुल कुल.
शिवसेना: दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, प्रकाश आबिटकर,
राष्ट्रवादी: छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, मकरंद पाटील, अनिल पाटील ,दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे किंवा राजू नवघरे, माणिकराव कोकाटे किंवा संग्राम जगताप,