मंत्रिमंडळ खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चुरस
जळगाव विशेष प्रतिनिधी I ;- महाराष्ट्र राज्याच्या विधानस निवडणुकांचा निकाल लागून आता एक महिन्याच कालावधी उलटला आहे. सुरुवातीला निकालानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता अनेक दिवस आणली गेली होती मात्र अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप याचीही राज्यासह देशांमध्ये उत्सुकता लागून होती. मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुद्दा गेले अनेक दिवस रखडला गेला होता.
अखेर राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्य मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. परंतु कोणालाही खाते वाटप जाहीर करण्यात आले नाही. यानंतर खाते वाटप जाहीर करण्यात आले. नागपूर येथे मंत्रिमंडळ शपथविधी दिला जळगाव जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते गिरीश भाऊ महाजन, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील आणि भुसावळचे संजय भाऊ सावकारे या तिघांनी शपथ घेतली.
खातेवाटप झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांना पुन्हा पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री हे खाते मिळाले. तर गिरीश भाऊ महाजन यांना जलसंपदा चे विदर्भ कोकण आणि तापी असे खाते मिळाले. संजय भाऊ सावकारे यांना वस्त्र उद्योग खाते मिळाले आहे. राजकारण असो की समाजकारण असो अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महान व्यक्तींच्या नावापुढे टोपण नाव लावल्याशिवाय त्यांची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. जसे अण्णा, आप्पा, नाना, भाऊ, दादा असे कितीतरी नावाच्या विशेषणाने व्यक्तींना ओळखले जाते.
आता जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्री असलेले गिरीश भाऊ महाजन, गुलाब भाऊ पाटील, आणि संजय भाऊ सावकारे हे तिघे देखील भाऊ या नावाने ओळखले जातात. किंबहुना त्यांच्या नावापुढे भाऊ अशी बिरूदावली लावली जाते. याचाच अर्थ असा की हे जिल्ह्यातील तिघे दिग्गज भाऊ यांची वर्णी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट पदी निवड झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याला तब्बल तीन मंत्री पदाचा लाभ या निमित्ताने मिळाला आहे. या या तीनही भाऊंचा ‘दबदबा’ महाराष्ट्रातील राजकारणात पाहायला मिळतो.
गिरीश भाऊ हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि संकट मोचक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे जलसंपदा खात्याशिवाय आपत्ती व्यवस्थापन खाते आहे. त्यामुळे कुठेही राजकीय पेज प्रसंग निर्माण झाला तर गिरीश भाऊ हे ते सोडवण्यासाठी जातात हे सर्वश्रुत आहे. तसेच राज्यात कुठेही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाल्यास गिरीश भाऊ हे यानिमित्ताने धावून जाणार आहेत
. त्यांच्याकडे या खात्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. गुलाब भाऊ पाटील हे गत वेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तर गिरीश भाऊ महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. दोन्ही नेत्यांना पालकमंत्री पदाचाही अनुभव आहे. संजय सावकारे हे आघाडी सरकारमध्ये असतानाही त्यांनी पालकमंत्री पदही भूषवले आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणला पालकमंत्री पद मिळते याची उत्सुकता देखील जळगाव वासियांना लागून राहिले आहे. पालकमंत्री पद हे गुलाबराव पाटील यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.